पाचोरा – पाचोरा ज्युनिअर कॉलेजमधीलभूगोलाचे माजी अध्यापक व माजी उपप्राचार्य प्रल्हाद लहानु खराटे यांचे ह्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि.१५ मार्च रोजी त्यांच्या मूळ गावी रिधोरा (ता.जामनेर) येथे अचानक निधन झाले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय गरीब कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकुल परिस्थितीत उच्चशिक्षण पूर्ण करीत तत्कालिन जळगाव नगरपालिकेत त्यांनी नौकरीस सुरुवात केली. त्यानंतर पाचोराकनिष्ठ महाविद्यालयात त्यांची प्राध्यापक म्हणून निवड झाली.
तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खऱ्या अर्थाने आचरणात आणून शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे मार्गदर्शक , उमदे व्यक्तीमत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेल्यानेपरिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले,सुना- नातवंडे,भाऊबहिणी असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जळगाव येथील रायसोनी ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्यपद सांभाळले होते.