जळगाव प्रतिनिधी । हुंडा कमी दिला म्हणून व तुझ्या घरून ३ लाख रुपये आण म्हणून पती विवाहितेचा छळ करीत होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आशाबाबा नगर येथील माहेर असलेल्या सुरेखा राहुल बागुल (वय-२९) यांचा विवाहित धुळे येथील राहुल प्रभाकर बागुल यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती राहुल बागुल याने टोमणे मारणे सुरू केले. लग्नात हुंडा कमी दिला, तु दिसायला चांगली नाही, दुचाकी व भावाला लॅब सुरू करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला.
शिवीगाळ व मारहाण करायला सुरूवात केली. यासाठी सासरा प्रभाकर शंकर बागुल, सासु विमल प्रभाकर बागुल, दिर अमोल प्रभाकर बागुल, नणंद सुवर्णा मधुकर चौधरी, नंदोई मधुकर लोटन चौधरी, नणंद रूपाली अशोक पवार, भाचा शुभम मधुकर चौधरी, भाची यशस्वी मधुक चौधरी, लहान भाचा विवेक मधुकर चौधरी सर्व रा. नाटेश्वर नगर, महादेव मंदीरासमोर जळगाव यांनी पाठबळ दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल रमेशा करीत आहे.