नवी दिल्ली – फ्लिपकार्टवर १६ ऑक्टोंबर पासून बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे. यात ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये दोन डिस्पे असलेला LG G8x ThinQ हा मोबाईल ग्राहकांना फक्त १९,९९९ रूपयांत मिळणार आहे. LG G8x ThinQ मोबाईल मध्ये ६. ४ इंचाचे दोन ओलेड फुल व्हिजन डिस्प्ले दिले आहेत. रिझाॅल्यूशन २३४०*१०८० आहे. तसेच यात क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे.
६ GB पर्यंत स्टोरेज दिला आहे. तसेच रियर पॅनलवर १२ मेगापिक्सल स्टॅंडर्ड व १३ मेगापिक्सलचा सुपर वाईड लेन्स ड्यूल कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डेडिकेटेड गुगल असिस्टंड बटनासह इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच या मोबाईलमध्ये ४००० Mah बॅटरी देण्यात आली आहे.