पाचोरा (अनिल येवले) – पाचोरा येथील संगीता नेवे यांनी आपल्या सामाजिक कामातून अनेक उपक्रमांत भाग घेऊन अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या जळगाव जिल्हा नेवे वाणी समाज विकास कार्यकारी सदस्य असून त्या महिला जिल्हा सरचिटणीस या पदावर असून त्यांनी काँग्रेस पक्षात ही त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
तसेच जळगाव जिल्हा महिला दक्षता समिती सदस्य विशेष कार्यकारी सदस्य ग्राहक सेवा संघ सदस्य गिरणा तापी पर्यावरण सदस्य पाचोरा पोलीस स्टेशन महिला भरोसा सेल सदस्य व पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्य राहून ही त्यांनी महिला सदस्या वर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशन व महिला दक्षता समिती सदस्य संगीता नेवे यांनी समझोता करून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
अशा अनेक प्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर असतात. तसेच तनिष्का ग्रुप सकाळच्या माध्यमातून बरेच प्रश्न सोडवण्यात त्यांना यश मिळाला व कुठलाही स्वार्थ न ठेवता एक महिला म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा सदैव असतोच. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून असतात. कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असो व शासकीय ते नियमित तत्परतेने हजर असतात त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.