Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पहिल्या टप्प्यात काही लसी अपयशी ठरतील

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in राष्ट्रीय
0
1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाची मोफत लस

नवी दिल्ली – चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० लाखांपेंक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील १५४ लसींवर संशोधन करण्यात येत आहे. काही लसी मानवी चाचण्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, युनायटेड किंग्डम वॅक्सिन टास्क फोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या कोरोना लसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पहिल्या टप्प्यात तयार होणाऱ्या लसी परिपूर्ण नसतील. लोकांनी लसींबाबत अति आशावादी राहू नये, असं केंट बिंघम यांनी सांगितले.

केट बिंघम म्हणाले की,’ कोरोना लस कधी उपलब्ध होईल हे सांगता येणार नाही. पहिल्या टप्प्यात तयार होणारी लस परिपूर्ण नसेल. या लसी कोरोनाचं संक्रमण रोखू शकत नाहीत. कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या काही लसी किंवा सर्वच लसी अपयशी ठरु शकतात. आपल्याला 65 वर्षांवरिल व्यक्तींमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करणारी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जगातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पुरवठा करावी लागणार आहे. मात्र, कोरोना लसीचे डोस तयार करण्याची क्षमता कमी आहे. सद्य परिस्थितीत युनाइटेड किंग्डममधील कोरोना लसीचे डोस करण्याची क्षमता देखील फार कमी आहे’, असं बिंघम म्हणाले.

कोरोनाची येणारी दुसरी लाट भयानक

लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधील वैज्ञानिकांना एका संशोधनात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांमधील कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीची क्षमता कमी झाल्याचे आढळले. प्रतिकारक्षमता कमी झाल्यामुळे कोरोना संसर्ग जास्त वेळ राहण्याची शक्यता दिसून आली. कोरोनाची इंग्लंडमधील दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, असा अंदाज सरकारने वर्तवला आहे.

कोरोनावरील लसींचं संशोधन विविध देशांमध्ये सुरु आहे. मानवी चाचणी दरम्यान काहीवेळा लसींचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन कंपन्यांना त्याच्या कोरोना लसींच्या चाचण्या थांबवाव्या लागल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार १५४ कोरोना लसीवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. यापैकी ४४ लसी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

कोरोना लसीच्या शर्यतीत सध्या चीन सर्वात पुढे आहे. चीनमधील तीन कंपन्या सिनोवाक(चीन), सिनोफार्म (वुहान) सिनोफार्म (बीजिंग) या कंपन्यांच्या लसींच्या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. यामधील दोन कंपन्यांनी लस देशातील आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना द्यायला सुरूवात केली आहे. या कंपन्यांच्या लसीचा दुष्परिणाम समोर आलेला नाही.

Share post
Tags: Corona NewsCovid newsMarathi NewsNew DelhiVaccine
Previous Post

सिंधी कॉलनीमध्ये तरूणाला मारहाण करणाऱ्यास अटक

Next Post

IPL 2020 : गेल ठरला पंजाबसाठी लकी

Next Post
sport news

IPL 2020 : गेल ठरला पंजाबसाठी लकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group