जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ९७९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज देखील ६ रूग्णांचा मृत्यू झाला.
जळगाव शहर- ३७६, जळगाव ग्रामीण- ११, भुसावळ- १३७ , अमळनेर- १६, चोपडा-१०१, पाचोरा-२७, भडगाव-३२, धरणगाव- ८८, यावल-१२, एरंडोल- ९२, जामनेर- ३४, रावेर- १४ , पारोळा- ४, चाळीसगाव- १०, मुक्ताईनगर- ०, बोदवड- १९ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण ९७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात एकुण ७० हजार ६ २७ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ६१ हजार ६०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ५८१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज देखील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ४४४ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविली आहे.