Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील साखर व्यापाऱ्याची लुटप्रकरणी स्थागुशाकडून एकाला अटक

by Divya Jalgaon Team
March 14, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील साखर व्यापाऱ्याची लुटप्रकरणी स्थागुशाकडून एकाला अटक

जळगाव : जळगावातील साखर व्यापा-याची 7 लाख 90 हजार रुपयांची वसुली करुन परत जाणा-या कार चालकाची लुट झाल्याची घटना 7 मार्च रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसावद ते एरंडोल दरम्यान घडली होती. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपली तपासाची सुत्रे फिरवत खब-यांसह तांत्रीक माहितीचा आधार घेत दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमा-या आप्पा (रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.गिरड ता.भडगाव जि.जळगास) यास गिरड येथून ताब्यात घेतले. त्याने पोलिसी हिसका बघताच गुन्हयात चोरी केलेली मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एमएच 02 इआर 5382) व रोख रुपये 40 हजार काढून दिले आहेत.

या गुन्हयातील दुसरा आरोपी तुकाराम दिनकर पाटील उर्फ सोनु उर्फ मोघ्या (रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.बरखळा पठाणी, भोपाळ – मध्यप्रदेश ) याचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहकारी सहाय्यक फौजदार रा.का.पाटील, पो.हे.कॉ. विलास पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील यांना रवाना केले आहे. दिपक साहेबराव चव्हाण उर्फ डासमा-या आप्पा रा.सामनेर ता.जि.जळगाव ह.मु.गिरड ता.भडगाव जि.जळगास यास गुन्हयाच्या पुढील तपास कामी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.रा.का.पाटील, पो. हे. कॉ.अनिल इंगळे, विजयसिंग पाटील, विलास पाटील, सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, नितील बावीस्कर, विजय शामराव पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, स.फौ.रमेश जाधव ,मुरलीधर बारी तसेच पोउपनिरीक्षक श्री.रविंद्र गिरासे, स.फौ.विजय पाटील,नरेंद्र वारुळे यांनी सहभाग घेतला.

Share post
Tags: crimeJalgaonJalgaon newsrobberyजळगावातील साखर व्यापाऱ्याची लुटप्रकरणी स्थागुशाकडून एकाला अटक
Previous Post

जिल्ह्यात आज तब्बल 979 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ मार्च २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ मार्च २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group