Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोटारसायकलींची चोरी करणारे व तिचे विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात (व्हिडीओ)

चोरीची १७ मोटारसायकली हस्तगत

by Divya Jalgaon Team
March 13, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मोटारसायकलींची चोरी करणारे व तिचे विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात (व्हिडीओ)

जळगाव – जिल्ह्यातील विविध भागातून मोटारसायकलीं चोरी आणि विल्हेवाट लावणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात . तीन संशयित आरोपी फरार असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या घरी लावलेल्या चोरीच्या १७ मोटारसायकली हस्तगत करून ५ लाख ७ हजार किमतीची मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुचाकीची चोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्यास पथक रवाना केले.

पोलीस नाईक दशरथ पाटील आणि पो.कॉ भगवान पाटील यांनी भडगाव तालुक्यातील पथराळ येथील अतुल नाना पाटील याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे दोन चोरीच्या दुचाकी आढळून आल्यात. खाक्या दाखविताच त्याने साथीदार योगेश शिवाजी दाभाडे,  जगदिश बाळू शेळके,  निलेश ऊर्फ विक्की पुंडलीक पाटील तिन्ही रा.पथराळा ता.भडगाव (फरार) यांचेसह भिमराव रामअवतार प्रसाद,  अमजद आरिफ मन्सुरी दोन्ही रा.देवळा जि. नाशिक यांची नावे समोर आली. यातील अतुल पाटील, भिमराव प्रसाद आणि अमजद मन्सुरी यांना अटक केली आहे. या टोळीने रामानंद नगर, चाळीसगाव शहर, पाचोरा, पारोळा, मालेगाव छावणे, भोसरी जि. पुणे, येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या ताब्यातील ५ लाख ७ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या १७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. तर योगेश दाभाडे, जगदीश शेळके, निलेश पाटील तिन्ही फरार संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

पोउनि. रविंद्र गिरासे, सफौ विजय देवराम पाटील, पोहेको नरेंद्र वारुळे, पो.ना. संदिप सावळे यांच्या तांत्रीक मदतीच्या आधारे पोहेकॉ प्रदिप वसंतराव पाटील, पोहेकॉ जयंत चौधरी, पोहेकॉ गोरख बागुल, पोहेको सुनिल दामोदरे, पोहेकॉ अनिल जाधव, पोहेकॉ दादाभाऊ पाटील, पोहेकॉ महेश महाजन, पोहेकॉ वसंत लिगायत, पोहेकॉ विलास पाटील, पोना नंदलाल पाटील, पोना प्रितम पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना किरण धनगर, पो.कॉ. भगवान तुकाराम पाटील, पो.कॉ. पंकज शिंदे, पो.कॉ. उमेशगिरी गोसावी, स.फौ. इद्रीसखा पठाण, पोना अशोक पाटील, पोकॉ  मुरलीधर बारी यांनी यांनी कारवाई केली.

Share post
Tags: Divya JalgaonMarathi Newsपोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेस्थानिक गुन्हा शाखे
Previous Post

सावधान : जिल्ह्यात आज 986 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

चोपडा शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
चोपडा शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चोपडा शहरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group