चोपडा- चोपडा शहर कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिनांक 12 च्या मध्यरात्रीपासून म्हणजे दि. 13 पासून तर 14 च्या मध्यरात्रीपर्यंत दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र बस आगार सुरू असल्याने प्रशासनाच्या वतीने 4दुकानदाराना प्रत्येकी 5हजार रु चां दंड यावेळी देण्यात आला.
शहरात सर्वत्र कडकडीत बंद असल्याने फक्त मेडिकल स्टोअर्स आणि दूध विक्री करणारे दुकाने तेही तासभर सुरू दिसून आले. बाकी सर्वत्र एकही दुकान उघडे नसल्याने व्यापाऱ्यांनीही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र एस टी चे आगार सुरूच असल्याचे दिसून आले. बस फेऱ्या सुरू असल्याने फक्त रस्त्याने प्रवाशी ये-जा करतांना दिसून आले.
बस आगार सुरू असल्याने त्या परिसरातील उघडे असणाऱ्यांना दुकानदारांना दंड –
आज नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने बस स्टैंड च्या आवारात दुकान सुरु ठेवले म्हणून ओम वेफर्स, शिमला फ्रूट्स, साई रेस्टोरेंट व नवनाथ जनरल ह्याना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे दंड करण्यात आला. ह्या कार्रवाइत नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे इंजीनियर सचिन गवांदे,राजेन्द्र बाविस्कर, मनोहर बाविस्कर,रमण साळूखे, नरेंद्र आके ह्या समितीने दंडात्मक कारवाई केली.
प्रशासनाच्या आदेशानुसार आज चौकाचौकात पोलिस कर्मचारी ,नगरपरिषदेचे कर्मचारी व तहसीलदार अनिल गावित, पोलिस निरीक्षक अवतार सिंग चौहान,एपीआय, सावळे, रस्त्यांवर बंद करण्यासाठी दिसून आले.


