जळगाव : प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांची आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, रा.कॉ. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील यांनी कल्पना पाटील यांचे अभिनंदन केले आहे.