जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगरात राहणाऱ्या वडील व मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
जळगाव शहरातील आदर्श नगरात राहणारे दीपक रतीलाल सोनार (वय ६३) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी कोरोना बाधीत झाल्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीपक सोनार यांची मुलगी व जावई त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी उपचार सुरू असणार्या आईची विचारपूस केली.
यानंतर सायंकाळी मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आली असता दीपक रतीलाल सोनार (वय ६२) व त्यांचा मुलगा परेश दीपक सोनार (वय ३४) यांचे मृतदेह त्यांना आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता विष प्राशन केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पोलीसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


