जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील व महानगर सचिव कुणाल पवार यांच्या उपस्थितीत निवड केलेल्या सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडीची कार्यकारिणी याप्रमाणे, महानगराध्यक्षपदी हेमंत सोनार, महानगर सचिवपदी प्रवीण धनगर, महानगर कार्याध्यक्षपदी मनोज भालेराव, महानगर सरचिटणीस सागर पाटील, उपाध्यक्षपदी सुनील दाभाडे, प्रवीण पाटील, अनिल शेलकर, विजय विसपुते, सहसचिवपदी विजयसिंग पाटील, पांडुरंग पवार, पंकज सूर्यवंशी, मनोज बावस्कर, तर सहसरचिटणीस मुरलीधर कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर सचिव कुणाल पवार यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.