पाचोरा – जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले असून आज रोजी जिजाऊ चरित्र देऊन त्यांच्या सन्मान जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी डी वाय एस पी काकडे , पोलिस निरीक्षक किशनराव नजन पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा प्रा. सुनीता मांडोळे गुंजाळ यांच्या संकल्पनेतून हां कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी प्रा सुनीता गुंजाळ यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दुर्गा बनून खंबीरपणे घराची व जनतेची ही काळजी घेतली. खऱ्या अर्थाने हेच कोरोना योद्धा आहेत असे सांगितले. महिलानी जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले तर अरुणा उदावत यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले.
या कार्यक्रमाला महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस हवालदार शारदा भावसार , महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, वैशाली मराठे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष प्रा. प्रतिभा पाटील सचिव योगीता पांगारे संघटक अरुणा उदावत , अमृता मराठे आदींची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पाटील यांनी तर आभार अमृता मराठे यांनी मानले.