चोपडा (मिलिंद सोनवणे)- आज जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य म्हणून जगभरात महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तिच्या गुण वैशिष्ट्ये मांडली जातात, तिला शक्तीची देवी देखील संबोधले जाते, पण तिचे अस्तित्व एक दिवसा पुरतेच आहे का? हा खरा प्रश्न आहे,जागतिक महिला दिन हा जरी सर्व जगभर साजरा केला जात असला, तरी आपली संस्कृतीच मुळात स्त्री सन्मानाची आहे. कारण, आपल्याकडील सर्वात मोठे पद हे आईचे असते.
आपल्या महाराष्ट्रात ‘आई ची महती “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ‘ या भावपूर्ण आणि लौकिकार्थाने मांडली आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. त्यामुळे हा महिला दिन म्हणजे आपल्या समस्त मातांचा गौरव आहे. आई आपल्या मुलांसाठी, संसारासाठी कोणताही त्याग करू शकते, कोणताही संघर्ष करू शकते. हे प्रत्येक स्त्रीच्या वाटय़ाला येत असते. असाच संघर्ष करून जगण्याची लढाई लढत असलेल्या विमुक्त भटक्या समाजातील पांचाळ समाजाच्या स्त्री चे एक उदाहरण…
अजून ही काही स्त्रीयाची व्यथा संपता संपलेली नाही आज आपण आधुनिक भारताची स्वप्न बघतोय. एकीकडे चंद्रावर घर बांधन्याची तयारी चालली आहे. तर दुसरीकडे महिलांचे हाल, उपेक्षा थांबत नाही. असाच एक प्रकार आज चोपडा येथे पहावयास मिळाला, नारायण वाड़ी येथे तीन ते चार कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावाहुन आले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय आहे शेतीसाठी लागणारे औजार बनवणे,विळा, खुरपी, व इतर लोखंडाच्या वस्तु बनवून त्यांच्या महिला दारोदारी जावून उन्हा तान्हात भटकंती करून विक्री करून आपल्या चिमुकल्या मुला बाळासकट घराचा राडा सांभाळतात. प्रत्येक गावाला आठ ते दहा दिवस ते राहतात, त्यांच्या मुलांचे ही शिक्षण होत नाही, त्यांच्यासमोर असतो मोठा प्रश्न फक्त पोटाची खळगी भरण्याचा. सुरुवातीच्या काळापासून समाज व्यवस्थे निहाय व्यवसाय लावून दिल्याने त्यांच्या व्यवसाया शिवाय त्यांना दूसरे काही ही काम धंदे जमत नाहीत, त्यामुळे त्यांनी आधुनिक काळात ही परंपरागत व्यवसाय सुरुच ठेवला आहे.
भर उन्हात ही डोक्यावर छत नाही, दोघे नवरा बायको गरम् भट्टी वर तप्त अश्या आगी वर कोयता,विळा,खुर्पी बनवत होते.एखाद्या माणसाला ही उचलता येणार नाही अश्या चार ते पांच किलो च्या हातोड्याने एक महिला लोखंडावर घाव घालत होती,लहान चिमुकली मुलगी ती भट्टी पेटवत होती, तर त्यांच कुटुंबातील पुरुष ही त्यां वस्तुं ना दुसऱ्यां हाताने घाव देवून आकार देत होता, पण त्यां गरीब दिन दुबळ्या कुटुंबा जवळ काहीही नव्हते, न डोक्यावर छत न घर न दार, ना प्रॉपर्टी,ना बैंक बैलंस पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर निरामय दिलखुलास हास्य होते.ते हास्य महालात, बंगल्यातील लोकांकड़े ही बघायला मिळत नाही.म्हणून बहिणाबाई चौधरी च्या ओव्या आठवतात त्यांनी आपल्या कवितेत अस म्हटल आहे …………..
एक संसार संसार,दोन्ही जीवांचा ईचार,
देतो सुखाले नकार ,अन दुखाले होकार!
देखा संसार संसार ,दोन्ही जीवांचा सुधार,
कधी नगद उधार,सुख दुखा चां बेपार.!
https://www.youtube.com/watch?v=vnqnwSxs8xc