अमळनेर – येथील शिवाजीनगर भागातील एका तरुणाच्या घरी पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून ३६ हजराचा माल जप्त करून त्यास अटक केली आहे. या तरुणाने गुटखा विक्री करण्यासाठी घरातच साठा केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक रवींद्र पाटील, पोलीस नाईक दीपक माळी व महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी यांनी नवीन स्वामिसमर्थ मंदिराजवळील शिवाजीनगर भागात राकेश हिरालाल या तरुणाच्या घरी छापा टाकला असता,
त्याच्या घरात विमल गुटख्याचे २३ पाकिटे, बाबा ब्लॅक तंबाखू १९ पाकिटे, दिललागी सुपारी ४४ पाकिटे, विमल जर्दा तंबाखू २३ पाकिटे , लहर सुगंधित तंबाखू ३३ पाकिटे, बागबान तंबाखू १८ पाकिटे व ८ डबे, बागबान ४४० तंबाखू ३० पाकिटे, रोजी सुगंधित सुपारी ३०० पाकिटे, टोबॅको सिल्व्हर व लाल प्रत्येकी २९ पाकिटे , रत्ना ३०० तंबाखू ८ पत्री डबे, सुगंधित बुलेट किमाम ३ काचेच्या बाटल्या असा एकूण ३६ हजार ६६० रुपयांचा माल जप्त करून आरोपी राकेशला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.