नवी दिल्ली, वृत्तसंस्था : डेस्कटॉप ॲपसाठी (Desktop App) व्हॉट्सॲपने (WhatsApp) आता व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग (Voice and Video Calling for web whatsapp) ही फीचर्स आणली आहेत. या इन्स्टंट मेसेजिंग ॲपने याबाबत Tweet करून माहिती दिली आहे. परंतु प्रत्यक्षात डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरून whatsapp वापरताना ही फीचर कधी वापरता येणार याबबात अद्याप कुठलाही उल्लेख कंपनीने केलेला नाही.
फेसबुकच्या (Facebook) मालकीचा फ्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपने असा दावा केलाय की फोन ॲप्सवरील व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग प्रमाणेच डेस्कटॉप ॲपला देखील सुरक्षिततेसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-To-End Encryption) करण्यात आलं आहे.