Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

न्हावी, हिंगोणा, भालोद या परिसरात वाळु माफीयाचा धुमाकुळ

स्थानिक महसुल प्रशासनाने कारवाई करावी

by Divya Jalgaon Team
March 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव, प्रशासन
0
रावेरात ६ हजारांच्या वाळूसह २ ट्रॅक्टर जप्त

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यात आणी परिसरात मोठया प्रमाणावर अवैध गौणखनिजाची बेकाद्याशीररित्या सर्रासपणे चोरटी वाहतूक केली जात आहे. यामुळे महसुल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याकडे महसूल विभागाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.

यावल तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व मोठी असलेली गावे हिंगोणा,भालोद, न्हावी या गावातून मागील अनेक दिवसापासुन मध्यरात्रीच्या वेळेस विना परवाना जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात खोदकाम करून ट्रॅक्टरमध्ये अनधिकृत वाळूची वाहतूक केली जात आहे. या संपुर्ण परिसरात हा बेकाद्याशीर धंदा मोठया  जोमाने सुरू असुन , या गावात सुरू असलेली खाजगी ईमारतीच्या लाखो रुपयांच्या बांधकामांवरही याच मार्गाने मिळणारी वाळू खुलेआम वापरली जात आहे.

या सर्व प्रकाराकडे स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निसर्गप्रेमीकडुन बोलले जात आहे. सदरच्या बेकाद्याशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबत किमान महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून साधी चौकशी देखील केली जात नसल्याचे दिसून येत आहे. या अनधिकृत गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याचे ते चांगलेच मस्तावले असल्याचे चित्रदिसून येत आहे. येथील नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खो पाडण्यात येतात. त्यातून मातीची मोठी वाहतूक केली जाते.

हिंगोणा गावातील या अनधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी चार ते पाच ट्रॅक्टर लावण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. स्थानिकपातळीवरची वाहनधारक मंडळी यात सहभागी आहेत. यामुळे हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. हा परिसर भालोद महसूल मंडळाच्या नियंत्रणात येतो. त्यामुळेयाकडे गांभीयनि लक्ष देऊन अनधिकृत: वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची गरज आहे.

Share post
Tags: crimeTahsilYawalन्हावीभालोद या परिसरात वाळु माफीयाचा धुमाकुळहिंगोणा
Previous Post

आता Whatsapp डेस्कटॉपवरून वापर करता येणार व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल

Next Post

व्यवसाय कर, मार्केट फी रद्द करावी!

Next Post

व्यवसाय कर, मार्केट फी रद्द करावी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group