Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांवर खडसेंचे लक्ष

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in जळगाव, राजकीय
0
eknathrao khadse news

जळगाव – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आता जळगाव महापालिकेतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नगरसेवकांची ‘कुंडली’ जमा करण्यास प्रारंभ केला असून यामुळे जळगाव महापालिकेतील घडामोडी गतिमान होणार असल्याचे दिसून येत आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे पहिले टार्गेट हे जळगाव महापालिका असेल असे आता स्पष्ट झालेले आहे. महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी केलेली बंदद्वार चर्चा याकडे निर्देश करत आहे. दरम्यान यानंतर जळगाव महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी खडसे यांची भेट घेतली. यात विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याकडून खडसे यांनी महापालिके विषयी माहिती जाणून घेतली.

यामध्ये  विशेष करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नगरसेवकांची कुंडली जमा करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली  आहे. ऑगस्ट २०१८  मध्ये झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने महापालिकेत दणदणीत विजय संपादन केला होता. याप्रसंगी भाजपने दबावतंत्राचा वापर केला असल्याची चर्चा रंगली होती.

या पार्श्‍वभूमीवर आता जळगाव महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्याच्या दृष्टीने अथवा यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचारावरून बरखास्त करण्याच्या दृष्टीने एकनाथराव खडसे यांचे प्रयत्न असतील का ? याकडेही  आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  जळगाव महापालिका ही जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसून येत आहे

Share post
Tags: Eknathrao Khadse NewsJalgaon Mahapalika NewsJalgaon newsPolitical News
Previous Post

पाकिस्तान हादरलं! पेशावरमध्ये मदरशात मोठा स्फोट

Next Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनाेहर पाटील अपात्र

Next Post
krushi utpanna bazaar samiti

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनाेहर पाटील अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group