पेशावर । पाकिस्तानातील पेशावरमध्ये एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. हा स्फोट दिर कॉलनीच्या मदरशाजवळ झाला असून, या स्फोटात 7 बालकांचा मृत्यू झाला असून, 70 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
जखमी झालेल्या बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानातील डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सात बालकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामागचं कारण अद्याप समजु शकलेलं नाही. पण काही जणांना असे अंदाज वर्तवले आहे की, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असावी. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरु आहे.


