जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा संघटक विनोद कांबळे यांची जनहित मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य भारत (ह्युमन राईट्स )तर्फे अंजली डोंगरे राष्ट्रीय महिला अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष सम्राट पारखे यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असून विनोद कांबळे हे सतत समाजासाठी कार्य करत असतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे आपली समस्या घेऊन जातात तसेच श्री कांबळे त्यांच्यासाठी तत्पर असतात असे त्यांच्यासोबत असणारे अनेकांनी सांगितले.