Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात सांस्कृतिक कला महोत्सवाची सुरुवात

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in क्रीडा, जळगाव, शैक्षणिक
0
प.वि.पाटील विद्यालयात सांस्कृतिक कला महोत्सवाची सुरुवात

जळगाव – कोरोना विषाणूच्या महामारी मुळे सर्वच शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने घेतला जातोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगावच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व घरात बसून निर्माण झालेला आळस दूर व्हावा व मनोरंजनाचे एक साधन मिळावे आणि त्यातूनच विद्यार्थी घडावा या उद्दिष्टाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे.

सदर कला महोत्सव हा दि.1 ते ६ मार्च दरम्यान राबवला जाणार असून त्यासाठी चित्र कला ,कार्यानुभव ,मिमिक्री ,एकल गायन ,वाद्य वादन, एकल नृत्य, बालगीते, कोळी गीते ,देशभक्तीपर गीते ,शेतकरी नृत्य, भांगडा ,गुजराती नृत्य या सर्व प्रकारच्या कलागुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यां मार्फत कला महोत्सवामध्ये केली जाणार आहे. त्यासाठी शाळेतील विविध इयत्तेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विषय देऊन त्यांच्याकडून सदर कलागुणांचे फोटो आणि व्हिडिओ शाळेतर्फे मागवले गेलेले आहेत आणि त्यांचं प्रक्षेपण दि. 3 ते 6 मार्च दरम्यान केले जाणार आहे.

आज केसीई सोसायटीचे शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी,  चंद्रकला सिंग ,स्मिता कुळकर्णी ,दिलीप कुमार चौधरी तसेच मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटनाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव , सरला पाटील, धनश्री फलक सूर्यकांत पाटील,दिपाली चौधरी ,इंदू राणे अशोक चौधरी ,देवेंद्र चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Share post
Tags: # Divya Jalgaon latest newseducation related newsMarathi Newsकला महोत्सवाची सुरुवातकेसीई सोसायटी
Previous Post

जनहित मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य भारत पदी विनोद कांबळे ची निवड

Next Post

घरगुती वादाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Next Post
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

घरगुती वादाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group