जळगाव प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ 15 लाखांची रोकड घेऊन जात असलेल्या दोन जण हे धुळे येथील असल्याचे समजल्याने पोलिसांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास पंधरा लाखांची रोकड घेऊन जाणार्या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड लुटण्याची घटना घडली. याप्रसंगी झालेल्या झटापटीत चोरट्यांकडील बाईक व काडतुसांचे मॅगेझिन रस्त्यावरच पडले. तर, परिसरातील काही सीसीटिव्हींमध्ये हे चोरटे जेरबंद झाले. यातून केलेल्या चौकशीतून दोन्ही चोरटे हे धुळ्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे मनोज मोकळ आणि विक्की राणा आहे. पोलिसांनी या दोघांचा माग काढण्यास प्रारंभ केला. यात ते धरणगावमार्गे अमळनेरकडे निघून गेल्याचे दिसून आले आहे. त्यांचा तपास करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून ते या दोन्ही चोरट्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


