Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी मानले शेतकऱ्यांचे आभार, राज्यातील 4 लाख शेतकऱ्यांनी भरले 368 कोटी, तर जळगाव परिमंडलातील 26 हजार शेतकऱ्यांनी भरले 24 कोटी

by Divya Jalgaon Team
March 1, 2021
in जळगाव, प्रशासन, राज्य
0
महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

जळगाव/धुळे/नंदुरबार :  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये जाहीर झालेल्या या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात 4 लाख 21 हजार 789 शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी 368 कोटी 22 लाख रुपये आजपर्यंत भरले आहेत. तर जळगाव परिमंडलातील 26 हजार 394 शेतकऱ्यांनी 24 कोटी 76 लाखांचा भरणा केला आहे.

या अभियानास मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून  थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या अभियानात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 50 टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे. दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.

या अभियानात महावितरणच्या जळगाव परिमंडलांतर्गत धुळे जिल्ह्यातील 10 हजार 391 शेतकऱ्यांनी 6 कोटी 10 लाख, जळगाव जिल्ह्यातील 11 हजार 27 शेतकऱ्यांनी 12 कोटी 81 लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील 4 हजार 976 शेतकऱ्यांनी 5 कोटी 85 लाख रुपयांची थकीत वीजबिले भरली आहेत.

गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्त्वाची तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

Share post
Tags: elctric billJalgaonMahavitaranमहा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
Previous Post

जिल्ह्यात आज 396 रुग्ण कोरोनाबधित आढळले

Next Post

देवझिरी वनक्षेत्रात सागवान तस्कराकडूंन हल्ला

Next Post
देवझिरी वनक्षेत्रात सागवान तस्कराकडूंन हल्ला

देवझिरी वनक्षेत्रात सागवान तस्कराकडूंन हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group