चोपडा –( मिलिंद सोनवणे ) देवझिरी वनक्षेत्रात सागवान लाकूड़ तस्कराकडूंन वनकर्मचाऱ्यांवर हल्ला झाला असल्याचे वन कर्मचारी आणि अधिकारी यांनी सांगितले.
सातपुड्यातील जंगल सुरक्षित राहावे यासाठी वनकर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवली असून सागवान तस्कराच्या मनसूब्यावर पाणी फेरले आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वनियोजित कट कारस्थान करून हल्ला केला. त्यात सहा कर्मचारी आणि चार राज्य राखीव दलाचे जवान जख्मी करीत उभ्या असलेल्या सागवान डेरेदार वृक्षाची कत्तल केली आहे.
पिंजरा गाड़ी ने वाचविले प्राण
रात्री साड़े बारा ते अडीच च्या दरम्यान तस्करानी लाकूड़ तोड़ सुरु करताच गस्ती पथकाने त्यांना कत्तल करण्यास मज्जाव केला. त्यावेळी 30ते 40 लाकूड़ तस्कर यांनी गोफणीच्या सहाय्याने दगडाचां मारा सुरु केला. हा हल्ला इतका जोरदार होता कि राज्य राखीव दलाच्या जवानाच्या हेल्मेटची जाळी तोडूंन मानेला मार लागला.
अनेक जण जख्मी झाल्याचे लक्ष्यात येताच इतर कर्मचारी शासकीय वाहन पिंजरा गाड़ीत बसले, त्यां वाहनावर सुद्धा त्यांनी दगड़ फेक केली पण त्या गाड़ी ला जाळी असल्याने दगड आत येवू शकले नाहीत,शेवटी स्वतः च्या रक्षणाकरिता जवानानी हवेत गोळीबार केला तेव्हा ते तस्कर पळून गेले व सर्व वनकर्मचाऱ्यांचा जीव वाचला. जर पिंजरा गाड़ी नसती तर आमचा जीव गेला असता अशी प्रतिक्रिया जख्मी वनपाल पी.बी.महाजन यांनी आमचे प्रतिनिधी यांना सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपवन् सरक्षक धुळे चे वनवृत्तचे बी,डब्लू पगारे,उपवन सरंक्षक यावल वनविभाग जळगाव चे एच, एच पदनाभ,सहायक वन सरंक्षक पवार,वनक्षेत्रपाल एस, एम,सोनवणे, यांनी घटना स्थळी पाहणी करून वनकर्मचारी यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून जंगल वाचविले म्हणून कौतूक केले तसेच ह्या बाबत अड़ावद पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.