जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंद नगर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या तरूणीच्या विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी दोन जणांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या तरूणीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून सोनल हर्षल फुलझाडे आणि प्रकाश हिरालाल फुलझाडे दोन्ही रा. पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव यांनी २७ फेब्रुवारी रोजी तरूणीच्या घरी येवून क्रिकेटच्या बॅटने मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील संशयित आरोपी महिला सोनल फुलझाडे हिने देखील चापटा व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर प्रकाश फुलझाडे याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला.
याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ श्रध्दा रामोशी हे पुढील तपास करीत आहेत.