नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदाता असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती असतानाही स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारच्या गृह कर्जावरील (Home Loan) प्रक्रिया शुल्क माफ (Waived Processing Fee) केले आहे. त्याचबरोबर एसबीआय सध्या वार्षिक 6.28% व्याज दराने (Interest Rates) गृहकर्ज देत आहे. एसबीआय रेग्युलर होम लोन, सरकारी कर्मचार्यांसाठी एसबीआय प्रिव्हिलेज होम लोन, सैन्य आणि संरक्षण कर्मचार्यांसाठी एसबीआय शौर्य होम लोन सुविधा देत आहे.
7208933140 वर मिस कॉल देऊन संपूर्ण माहिती मिळवा
एसबीआय मॅक्सगेन होम लोन, स्मार्ट होम्स, सध्याच्या ग्राहकांसाठी टॉप-अप लोन, एनआरआय होम लोन, मोठ्या निवासी कर्जांसाठी फ्लेक्सीपे होम लोन आणि महिलांसाठी विशेष एसबीआय हरघर होम लोन योजना देखील चालवित आहे.
एसबीआयने सांगितले की, नवीन ग्राहक 7208933140 वर मिस कॉल देऊन होम लोनशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. हाऊसिंग डॉट कॉम (Housing.com), मकान डॉट कॉम (Makaan.com) आणि प्रॉपटीगर डॉट कॉम (Proptiger.com) चे ग्रुप सीओओ मणि रंगराजन म्हणाले की,’ प्रक्रिया शुल्क भरल्यामुळे होमलोन खूपच महाग होत आहेत. एसबीआय यामध्ये सूट देऊन ग्राहकांना मोठा फायदा देते आहे.’
एसबीआय-शापूरजी पालनजीच्या ग्राहकांना मोठा फायदा होईल
ऐतिहासिकदृष्ट्या कमी व्याजदरासह होम लोन मार्केट मधील एसबीआयचा 34 टक्के वाटा आहे. एसबीआयने म्हटले आहे की,डिसेंबर 2020 मध्ये त्याच्या होम लोनच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे. त्याच वेळी गेल्या आठवड्यात बँकेने शापूरजी पालनजी रिअल इस्टेटशी करार केला आहे. त्याअंतर्गत एसबीआय आणि शापूरजी पालनजी यांच्या ग्राहकांना होम लोन अतिशय जलद उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांना अनेक अनोख्या योजनांचा लाभ मिळणार आहे. एसबीआयने नुकतेच 5 लाख कोटींच्या होम लोनच्या व्यवसायाचा आकडा पार केला आहे. आता बँकेने आर्थिक वर्ष 2024 पर्यंत होमलोन व्यवसायाला 7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.