Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

जळगांव – रस्ते अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून हायवे मृत्यूंजय दूत योजना राबविण्यात येणार आहे.

देशात दरवर्षी सुमारे दिड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकदा अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडून राहतो. मदतीची विनवणी करतो, परंतु उगीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा विचार करून कोणी मदत करत नाही.

हा प्रकार लक्षात घेऊन जखमींना योग्य आणि तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीचे मंडळीना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अपर पोलिस महासंचालक(वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गावर हायवे मृत्यूंजय दूत हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

सदर उपक्रमाचा राज्यभरात १ मार्च २०२१ पासून प्रारंभ होणार असून जास्तीत जास्त अपघातग्रस्त नागरिकांना मदत करुन त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या दूताच्या कामाची नोंद घेतली जाईल. तसेच महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे, महामार्गावरील गावातील सेवाभावी व्यक्ती अश्या लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन जवळील दवाखाना व रुग्णवाहिकेचे नंबर उपलब्ध करून देऊन त्यांना हायवे मृत्यूंजय दूत असे ओळखपत्र दिले जाईल.

Share post
Tags: Jalgaon newslatest newsMarathi Newsअपर पोलिस महासंचालक(वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्यायहायवे मृत्यूंजय दूत
Previous Post

आरबीआय एमएसएमई समितीवर संजय दादलिका यांची निवड

Next Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group