मुंबई, वृत्तसंस्था : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा न दिल्यास विधिमंडळ अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षानं दिला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात होतं.