नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी खास सुविधा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान सुट्टीवर जात असताना त्यांना एमआय-१७ विमानांचा वापर करता येईल.
काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी आयईडीचा वापर करतात. त्यामुळे जवानांना धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं सीआरपीएफच्या जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.