जळगाव : शुक्रवारनंतर सोने-चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा घसरण झाली. चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपये घसरण होऊन ती ६८ हजार ५०० रुपये तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ते ४६ हजार ६०० रुपयांवर आले.
मागणी कमी व सट्टाबाजारातील खरेदी-विक्रीचा हा परिणाम आहे. गेल्या आठवड्यात भाववाढ होत राहिलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी घसरण झाली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा शुक्रवारपेक्षा घसरण वाढली.
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ कायम असल्याने सोने ४७ हजारांच्या पुढे होते. मात्र १९ फेब्रुवारीला ते ४६ हजार ९०० रुपयांवर आले होते.