Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

by Divya Jalgaon Team
March 2, 2021
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात असतं. याच दरम्यान युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने आता एका खास फीचरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या फीचरमुळे पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत. कंपनीने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केलं जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाऊंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल.

त्यामुळे त्यांची मुलं काय बघतात यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकतील.

नव्या फीचरसाठी कंपनी तीन वेगवेगळ्या सेटिंग्स जारी करेल. सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना देईल.

1. Explore

ही सेटिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांचं वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.

2. Explore more

ही सेटिंग 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल.

3. Most of YouTube

या सेटिंगमध्ये मुलं यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील. मुलं केवळ Age Restrictions वाले संवेदनशील व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share post
Tags: Marathi NewsNew DelhiNew FeaturedTechnologyYouTubeपालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदतमुलं फोनवर नेमकं काय पाहतात?
Previous Post

महत्वाची बातमी : 1 मार्चपासून देशात होतील ‘हे’ 4 मोठे बदल; जाणून घ्या

Next Post

जि.प.चे लालचंद पाटील यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार

Next Post
जि.प.चे लालचंद पाटील यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार

जि.प.चे लालचंद पाटील यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group