जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी शिरसोली, वसंतवाडी, वराड, वडील या रस्त्याला मान्यता मिळालेली आहे. सुमारे दोन कोटी ३६ लाख रूपये इतकी तरतूद यासाठी करण्यात आलेली असून यात रस्त्याच्या नूतनीकरणासह जलनित्सारणाची सुविधा करण्यात आलेली आहे.
आज सायंकाळी शिरसोली प्र.न. येथे आयोजीत कार्यक्रमात या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, या रस्त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची सोय होणार आहे. मतदारसंघात याच प्रमाणे विकासकामांचा झंझावात कायम राहणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जि प सदस्य पवन सोनवणे प स सभापती नंदलाल पाटील , नाना सोनवणे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण कृ उ बा सदस्य पंकज पाटील शिरसोली सरपंच प्रदीप पाटील शिरसोली प्रा न सरपंच हिलाल भिल ग्रा प सदस्य नितीन बुंदे प्रवीण पाटील सुनील पाटील रईस पिंजारी मुरलीधर धेंगळे सुधाकर पाटील सलीम खाटीक अकिल् मणियार श्रवण ताडे बापू मराठे अनिल पाटील अनिल बोबडे द्यानेश्वर साबळे अनिल महारु पाटील भगवान पाटील प्रणय सोनवणे शशिकांत वाणी मुश्ताक पिंजारी उमाजी पांगळे विकास सोसायटी चेअरमन रमेश पाटील पी के पाटील नेमीचंद जैन संजय पाटील चावदस कोळी साहेबराव पाटील समाधान चिंचोले उपस्थिती होती.