जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात २८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. १५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच चोपडा तालुक्यातील एका रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- १३९ , जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-१४ , अमळनेर-८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-३, यावल-५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-२ , पारोळा-४, चाळीसगाव-१७, मुक्ताईनगर-८, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण २८८ रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ६० हजार ४७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ८४५ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून २ हजार २४१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चोपडा तालुक्यातील एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.