जळगाव – पुजा चव्हाण हत्या प्रकरणी दोशी असलेल्या आ.संजय राठोड यांच्या विरोधात आज सकाळी 11: 30 वाजता आकाशवाणी चौकात भा ज पा जळगाव महानगर जिल्हा महिला आघाडी तर्फे चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते.परंतु पोलिसांनी वेळेवर येऊन त्यांच्या आंदोलनवर आक्षेप घेऊन ताब्यात घेतले व लगेच त्यांची सुटका केली. तसेच कैलास आप्पा सोनवणे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल न करण्यासाठी सांगत होते.
भाजप महिला आघाडीतर्फे आज आकाशवाणी चौकात चक्का जाम आंदोलन केले जाणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त ठेवला होता. तसेच आंदोलक येण्यापुर्वीच महिला पोलीस ही आंदोलन स्थळी दाखल झाले होते. तसेच पोलिसांनी ही अंदोलनकर्ते अंदोलन करण्यासाठी जेव्हा चौकात जाणार होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना जमावबंदी आदेश लागू असल्याचे म्हणत अंदोलन करण्यासाठी मज्जाव केला.तसेच त्यांना अटक ही केली. या सर्वाना पोलीस व्हॅनमध्ये बसवून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले.तसेच कैलास आप्पा सोनवणे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी हे जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी एक प्रकारे दबाव आणत होते.