Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना नियंत्रणामध्ये “शावैम” ची प्रयोगशाळा २४ तास कार्यरत

अत्याधुनिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे ‘लवकर निदान, लवकर उपचार’ झाले शक्य

by Divya Jalgaon Team
February 25, 2021
in जळगाव, प्रशासन
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर २९४ दिव्यांगांची तपासणी

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नरत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावत असून २४ तास नमुने तपासणी करून लवकर निदान व्हावे यासाठी अहोरात्र झटत आहे. १ लाख २५ हजाराच्यावर कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या आजवर पोहोचली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कमी वेळात तपासणी करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करीत केवळ साडे आठ महिन्यातच एक लाख तपासणी करून ‘लवकर निदान,लवकर उपचार’ करण्यात शासकीय वैद्यकीय यंत्रणेला यश आलेले आहे. सुरुवातीला जिल्ह्यात सदर प्रयोगशाळा सुरु नसल्याने जिल्ह्यातील कोरोना नमुने तपासणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठवावी लागत होती. नंतर आयसीएमआर आणि डीएचआर यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांनी प्रयत्न करून विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ मे २०२० पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर तपासणी अहवाल जलद प्राप्त होऊन संशयित रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार होण्यास मदत झाली.

सुरुवातीला १०० ते १४० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला जैन इरीगेशन जैवतंत्रज्ञान विभागातून एक अतिरिक्त आरटीपीसीआर चाचणी तपासणीचे मशीन प्राप्त झाले. त्यामुळे आता प्रयोगशाळेची नमुने तपासणीची क्षमता दिवसाला ५०० एवढी वाढली आहे. महाविद्यालय व रुग्णालयाला अत्याधुनिक “ऑटोमेटेड आरएनए एक्स्टेक्शन” मशीन देखील प्राप्त झाले असून त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे.

प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी लागणारे उपकरण व किट्स वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांचेमार्फत हाफकिन, मुंबई यांचेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले, डॉ. शुभांगी डांगे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्रियंका शर्मा यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी परिश्रम घेत आहे.

“ कोरोना नियंत्रणासाठी विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळेतील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने वेळेवर मिळावे, यासाठी कार्यरत यंत्रणा २४ तास तैनात आहे. कमी वेळेत चाचण्या पूर्ण झाल्यामुळे प्रयोगशाळेची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.”
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.

Share post
Tags: JalgaonJalgaon newsकोरोना नियंत्रणामध्ये "शावैम" ची प्रयोगशाळा २४ तास कार्यरत
Previous Post

कोरोना महामारीत शासकीय नियम स्वयंशिस्तीने पाळणे देवपुजे एवढेच श्रेष्ठ आ.राजू मामा भोळे

Next Post

जिल्ह्यात आज 279 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 279 रुग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group