नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समुद्रा पोहण्याची मजा घेत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हा.र लहोत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनोखा अंदाज चर्चा सध्या रंगत आहेत. केरळातल्या कोल्लममध्ये राहुल गांधी मच्छिमारांसोबत मासे कसे पकडतात हे पाहण्यासाठी समुद्रात गेले होते. मच्छिमार जाळं टाकून मासे पकडत होते त्यावेळी त्यांनी खोल समुद्रात उडी घेतली हे पाहून राहुल गांधींनीही समुद्रात उडी घेत चक्क मच्छिमारांसोबत १० मिनिटं पोहण्याचा आनंद लुटला.
राहुल गांधी हे मच्छिमाऱ्यांच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घण्यासाठी समुद्रात उडी मारली. यावेळी त्यांनी काही क्षण मच्छिमारांसोबत घालवत मासेमारी बद्दल चर्चा सुद्धा केली. यावेळी राहुल गांधी यांनी खाकीरंगाची लांबपॅन्ट आणि निळा टीशर्ट घातला होता, एएनआयने राहुल गांधींचा हा व्हिडिओ पोस्ट केला. राहुल यांचा हा अनोखा अंदाज सध्या व्हायरल होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मच्छीमारांसह त्यांच्या बोटीत बसले आणि समुद्रात गेले. त्यांनी बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वाडी तट किनाऱ्यावरूम प्रवास सुरू केला आणि सुमारे एक तास समुद्रात होते.
#WATCH| Kerala: Congress leader Rahul Gandhi took a dip in the sea with fishermen in Kollam (24.02.2021)
(Source: Congress office) pic.twitter.com/OovjQ4MSSM
— ANI (@ANI) February 25, 2021