चोपडा (प्रतिनिधी) – बँका आता ठेव साठी नव्हे तर कर्ज वितरित करण्यासाठी फिरत आहेत ज्या ग्राहकांचा व्यवहार चांगला त्या ग्राहकांना बँका कर्ज देण्यासाठी तप्तर सेवा देत असते. चांगल्या ग्राहकांचे बँका नेहमी शोध घेत असते. आणि चोपडा तालुक्यात अडावद गावात तर प्रगतिशील शेतकरी, कांद्याचे ,केळीचे व्यापारी राहत असल्याने या ठिकाण ची उलाढाल ही मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आहे. हे गाव जसे तालुक्यात प्रथम क्रमांकांचे आहे त्याच पद्धतीने आपली हक्काची बँक पिपल्स बँकेला अडावद परिसरातील ग्राहक जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर घेऊन जातील असा माझा ठाम विश्वास आहे. असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
चोपडा पीपल्स को ऑप बँकेच्या बाजार पेठ शाखेचे अडावद येथे स्थलांतर सोहळा प्रसंगी ते बोलत होते दि.२२ रोजी दुपारी ३ वा. अडावद शाखेचे उदघाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील, कॉग्रेस आयचे जिल्हाअध्यक्ष ऍड.संदीप भैय्या पाटील, चोपडा नगरपालिकेचे गटनेते जिवन चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि शासनाने घातलेल्या निर्बधाचा पालन करत उदघाटन सोहळा छोट्याखाणी पार पाडण्यात आला बँकेच्या केबिनलाच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अरुणभाईनी आपले विचार मांडले.
यावेळी अमळनेरचे आमदार अनिल पाटील, ऍड संदीप भैय्या पाटील यांनी देखिल बँकेला शाखा शुभारंभ प्रसंगी शुभेच्छापर भाषण केले. बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी बँकेचा आर्थिक आढावा आपल्या प्रस्तावनात सादर केले.
यावेळी अडावद परिसरातील भाजपाचे शांताराम आबा पाटील, दोडे गुजर समाजा संस्थाचे चेअरमन चंद्रशेखर पाटील,जि.प.सद्स्य दिलिप पाटील, अडावदचे उपसरपंच सौ.भारती महाजन, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील, खर्डीचे सरपंच राधेश्याम पाटील, दिनकरराव देशमुख, स्वप्नील काबरा,सतिष दहाड, पिंटू दहाड,हाजी फजल शेठ, लक्ष्मण महाजन, राजेंद्र देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सह सर्व संचालक, शेतकी संघचे चेअरमन व सर्व संचालक, पंचायत समितीचे सभापती, सर्व सद्स्य ,नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक, अडावद परिसरातील सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे सत्कार बँकेचे संचालक ऍड.रविंद्र जैन, मोरेश्वर देसाई, नेमीचंद जैन यांनी केले.