जळगाव – थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत गाडगे बाबाना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.