
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । उचंदा येथे काकाच्या लग्नामध्ये आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तोंडावर रुमाल बांधून अत्याचार केल्याची घटना 22 रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीवर पोस्को ची कलम तसेच बालकांचे लैंगिक शोषणतून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी ही दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घराशेजारीच पिठाच्या गिरणी मध्ये आपली राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेली असता आरोपी चेतन रवींद्र सुतार (वय 20) रा. उचंदा ता. मुक्ताईनगर याने संधी साधून पिठाच्या गिरणीचा दरवाजा बंद केला.तसेच तिच्या तोंडाला रुमाल बांधून आणि हातपाय बांधून जबरी अत्याचार केला आणि अत्याचारानंतर आरोपी चेतन हा फरार झाला.
पिडीता ही नेपानगर मध्यप्रदेश येथील रहिवासी
अल्पवयीन मुलीच्या आईच्य फिर्यादीवरुन अनुसूचित जाती जमाती कायदा आणि पोस्को ची कलम तसेच बालकांचे लैंगिक शोषणतून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीता ही नेपानगर मध्य प्रदेश येथील रहिवासी असून उचंदा येथे काकांच्या लग्नासाठी तीन दिवसांपूर्वीच आलेली होती.
पीडितेची वैद्यकीय तपासणी
दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले असून आरोपी चेतन रवींद्र सुतार यास जळगाव येथून शिताफीने सूत्र हलवत एका ट्रकमधून उतरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड तसेच पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी दुपारीच धाव घेतली आणि घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती करून घेतली. दरम्यान सायंकाळी उशिरा फॉरेन्सिक विभागाची टीम उचंदा येथे पोचली असून तपासणी करण्यात आली आहे.


