यावल (रविंद्र आढाळे) – जिल्हयात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरी तालुक्यात सुरू असेलेल लग्न समारंभ, बाजारपेठा यामधे नागरीकांची गर्दी राहत असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा महाराज देवस्थानवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रौत्सव रद्द असतांनाही सोमवारी (ता.२२) येथे भाविकांची गर्दी ऊसळून कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत तहसीलदार महेश पवार यांनी विश्वस्त समितीकडून दहा हजार दंड वसूल केला.
याशिवाय लग्न समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांत उपस्थितीतचे निर्बंध लावण्यात आले असताना देखील गर्दी होत आहे. येथे गंगानगरमध्ये एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जाऊळाच्या समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळुन आल्याने नगर पालिका प्रशासनाकडुन दोघं ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.तसेच शहरात तेरा दुकानदारांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे एकूण साडे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.येथे तब्बल साडे सव्वीस हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई करत ३१ जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसुल केला आहे. तर गेल्या दोन दिवसात ३० जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे १५ हजाराचा दंड वसुुल केला होता .
जिल्हाधिकारी यांनी जनतेला सुरक्षिततेच्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश दिले असले तरी नागरीक मात्र अजुनही गाफील राहत असल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील, पोलीस व संबधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेवून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कडक कारवाईचे आदेश दिल्याचे तहसीलदार महेश पवार यांनी सांगीतले . त्यानुसार पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून यापुढे नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघा्न केल्यास कडक कारवाइ करण्याचा येईल असा इशारा पो. नि. सुधिर पाटील यांनी दिला आहे.