Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

by Divya Jalgaon Team
February 20, 2021
in राज्य
0
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

मुंबई, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 37 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 39 पैशांनी वधारले आहे. मुंबईत आज पेट्रोल 96.94 रुपये आहे तर डिझेल 88.01 रुपये बघायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होतांना दिसते आहे.

देशातील प्रमुख शहरातील दर

मुंबई – पेट्रोल 96.94 रुपये, डिझेल 88.01 रुपये

दिल्ली – पेट्रोल 90.58 रुपये, डिझेल 80.97 रुपये

चेन्नई – पेट्रोल 92.59 रुपये, डिझेल 85.98रुपये

कोलकाता – पेट्रोल 95.33 रुपये, डिझेल 84.56 रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल 63 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात 0.51 टक्क्यांनी वधारून 63.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं. न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या (डब्ल्यूटीआय) मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये सत्रातील 1.31 टक्क्यांनी वाढून 60.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाईटरवर मिळेल. देशातील काही शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आहेत. इंधनाच्या किमती शहरांनुसार वेगवेगळ्या असू शकतात.

Share post
Tags: #Petrol-Diesel PriceMarathi NewsMumbaiसलग बाराव्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ
Previous Post

परसाडे येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेवुन आत्महत्या

Next Post

मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

Next Post
मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

मोठा निर्णय! आता बँक खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group