Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठी बातमी: लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग

by Divya Jalgaon Team
February 17, 2021
in प्रशासन, राज्य
0
नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय; लग्न सोहळ्यांवर पुन्हा निर्बंध

पुणे, वृत्तसंस्था : नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने आता पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. स्थानिक प्रशासनाकडून तशा जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना पुणे जिल्हा हा हॉटस्पॉट बनला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सतर्कतेचे आदेश

नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यात आजपासून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला प्रारंभ होणार आहे. तालुका स्तरावर कोरोनाची आढावा बैठक होऊन निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

लग्नाच्या हॉलमध्ये घुसून कारवाई, 10 हजारांच्या दंडाची वसूली

कोरोनाचे निर्बंध असूनही लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरे करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. मात्र, नागपुरात अशाच एका लग्नात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. सध्याच्या नियमानुसार लग्नाला 100 माणसं बोलावण्याची मुभा आहे. मात्र, या लग्नाला 250 हून अधिक लोक आले होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या लग्नात जाऊन कारवाई केली. या लग्नात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याने आयोजकांना पाच हजार आणि सभागृहाच्या मालकांकडून पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. नागपूर प्रशासनाकडून शहरातील सात मंगल कार्यालयांवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊन करावाच लागेल; राजेश टोपेंच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

Share post
Tags: Marathi NewsPuneमोठी बातमी: लग्नसमारंभांवर पुन्हा निर्बंध? प्रशासनाच्या हालचालींना वेग
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, १७ फेब्रुवारी २०२१

Next Post

दहावी – बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Next Post
Share Market : गिरावट के साथ खुला शेयर बाजार, 157 अंक नीचे सेंसेक्स By Khushboo| Published: Wednesday, February 17, 2021, 9:57 [IST] नई द‍िल्‍ली: आज सप्ताह के तीसरे कारोबारी दिन यानी बुधवार को शेयर बाजार गिरावट के साथ खुला। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज का प्रमुख इंडेक्स सेंसेक्स 157.41 अंक (0.30 फीसदी) की गिरावट के साथ 51946.76 के स्तर पर खुला। वहीं नेशनल स्टॉक एक्सचेंज का निफ्टी 43.40 अंक यानी 0.28 फीसदी की गिरावट के साथ 15270.10 के स्तर पर खुला। शुरुआती कारोबार में 641 शेयरों में तेजी आई, 563 शेयर में गिरावट दखी गई और 68 शेयरों में कोई बदलाव नहीं हुआ। Share Market : गिरावट के साथ खुला शेयर बाजार आज के दिग्गज शेयरों का हाल दिग्गज शेयरों की बात करें, तो आज शुरुआती कारोबार के दौरान एसबीआई, इंडसइंड बैंक, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सीमेंट, टेक महिंद्रा, भारती एयरटेल और बजाज फाइनें के शेयर हरे निशान पर खुले। वहीं एचडीएफसी बैंक, ग्रासिम, एक्सिस बैंक, अडाणी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व, जेएसडब्ल्यू स्टील और टाटा स्टील के शेयर लाल निशान पर खुले। प्री ओपन के दौरान सुबह 9.05 बजे सेंसेक्स 116.90 अंक (0.22 फीसदी) नीचे 51987.27 के स्तर पर था। वहीं निफ्टी 11.40 अंक (0.07 फीसदी) नीचे 15302.10 के स्तर पर था। मंगलवार के कारोबारी दिन उच्चतम स्तर पर खुला था बाजार पिछले कारोबारी दिन सेंसेक्स 308.17 अंक (0.59 फीसदी) की तेजी के साथ 52462.30 के स्तर पर खुला था। वहीं निफ्टी 56.57 अंक यानी 0.37 फीसदी की तेजी के साथ 15,371.45 के स्तर पर खुला था। बाद में गिरावट पर बंद हुआ था बाजार मंगलवार को दिनभर के उतार-चढ़ाव के बाद घरेलू शेयर बाजार गिरावट पर बंद हुआ था। सेंसेक्स 49.96 अंक (0.10 फीसदी) नीचे 52104.17 के स्तर पर बंद हुआ था। वहीं निफ्टी 1.25 अंक यानी 0.01 फीसदी की मामूली गिरावट के साथ 15313.45 के स्तर पर बंद हुआ था।

दहावी - बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group