जळगाव प्रतिनिधी । घरातील स्टोअर रूम फोडून एलसीडी चोरी केल्याची घटना 11 रोजी घडली होती. याप्रकरणी दुसरा संशयित जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यातुन त्याला तांबापूरातील राहत्या घरामधून गजाआड करण्यात आला आहे.
गणपती नगरातील सातपुडा हौसिंग सोसायटी येथील रहिवासी लखमीचंद घनश्यामदास आडवाणी (वय-४०) हे व्यावसायिक आहेत. त्यांचे शहरातील कंवरनगरात जुने घर आहे, त्या ठिकाणीकोणीही राहत नाही. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने घराचे स्टोअर रूम फोडून घरातून २० हजार रूपये किंमतीचा एल.सी.डी. टीव्ही चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले होते.. याप्रकरणी लखमीचंद आडवाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास शेडे यांच्या पथकाने दुसऱ्या दिवशी १२ जानेवारी रोजी संशयित आरोपी संतोष माणिक सोनार (वय-२०) रा. सिंधी कॉलनी याला अटक केली होती. आज १६ फेब्रुवारी रोजी दुसरा संशयित आरोपी दया शिवराम गायकवाड (वय-२०) रा. भिलवाडा, तांबापूरा याला राहत्या घरातील जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली.