Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इकरा युनानी मेडीकल महाविद्यालयामध्ये युनानी दिवस साजरा

by Divya Jalgaon Team
February 16, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
इकरा युनानी मेडीकल महाविद्यालयामध्ये युनानी दिवस साजरा

इकरा युनानी मेडीकल महाविद्यालयामध्ये युनानी दिवस साजरा जळगाव – इकरा युनानी मेडीकल महाविद्यालयामध्ये हकिम अजमल खान यांच्या वाढदिवसानिमित्त युनानी दिवस 15 रोजी साजरा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला जामिया तिबीया देवबंद कॉलेजचे सेक्रटरी व प्रोफेसर मा. डॉ. अनवर सईद ,चेन्नई येथुन मा.डॉ.उबेदउल्ला बेग तसेच मुंबईचे प्रसिध्द युनानी ईस्लाही दवाखान्याचे डॉ मोहम्मद इस्लाही बंधु, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार सदसय डॉ. इकबाल शाह, अ. रशीद शेख, जफर शेख, अमीन बादलीवाला मजीद जकेरीया सिविल हॉस्पीटलचे सिव्हील सर्जन डॉ. एन एस चव्हान, महाराष्ट्र कौंसिलचे डॉ. रफीक सैयद उपस्थीत होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. त्या नंतर तरानाए इकरा हे म्हम्हणण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते. सुत्रसंचालन डॉ. नाजमा खान व डॉ. शोएब शेख यांनी केले. विद्यार्थ्यांनी भाषण केले. त्या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी युनानी दिवसाचे महत्व सांगीतले. युनानी औषध उपचार पध्दतीमध्ये रुग्णांवर औषध उपचार करावे याचे महत्व सांगीतले. हकिम अजमल खान यांच्या वाढदिवसानिमित्त युनानी दिवस साजरा केला जातो व हकिम अजमल खान यांनी फक्त युनानी औषध पध्दतीला वाढवली नाही तर आर्युवेद औषधपधतीला सोबत घेऊन कार्य केले त्याचे उदघारण म्हणून दिल्ली येथील करोल बाग आर्युवेद युनानी मेडीकल कॉलेज हे आहे. जामिया तिबीया देवबंद येथील मा. डॉ. अनवर सईद यांनी आज आणि या पुर्वीचे अनेक उदा.देऊन युनानी कसे वाढत गेली आहे व त्याचे कार्य किती मोठे आहे. ते सांगितले व युनानी कार्य व औषधउपचार पध्दीतीचे विशेष महत्व सांगितले. चेन्नई येथील मा.डॉ.उबेदरल्ला बेग यांनी तर युनानी औषधीचे उगम कसे झाले कोणत्या देशात झाले युनानी औषधीचे निर्माण कोणत्या व कशाप्रकारे झाले आहे. त्याची सखोल माहिती त्यानी सांगितली.

महाराष्ट्र कौंसिलचे डॉ. रफीक सैयद यांनी महाराष्ट्र कौंसिलमध्ये होत असलेल्या नविन बद्वला बाबत माहिती सांगितले तसेच युनानी डे चे कार्यक्रमाचे कौतुक केले. डॉ एन एस चौहान यांनी कोरोनाच्या वेळेस इकरा युनानी मेडीकल कालेज केलेल्या कार्याचे अभिनंदन केले व इकरा एज्युकेश्न सोसाएटी आणि इकरा युनानी मेडिकल कलेज व हॉस्पीटल स्टॉफचे आभार मानले. इकरा एज्युकेश्न सोसायटीचे अध्यक्ष अ. करीम सालार यांचे अध्यक्षीय भाषण झाले त्यांनी पाहुण्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचे समर्थन केले युनानी औषोधउपचार पध्दती व त्याच्या प्रचार प्रसार कसे करावे व त्याचे माहिती दिली. जामिया तिबीया देवबंद कॉलेजचे सेक्रटरी व प्रोफेसर मा. डॉ. अनवर सईद यांना युनानीचे कार्य व प्रचार व प्रसार केल्यामुळे त्यांना पासबाने तिबे युनानी आवार्ड देण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यांचे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षा मध्ये विद्यापीठात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व ट्रॉफी देण्यात आले तसेच आलेल्या पाहुण्यांनी कार्यक्रमामध्येच विद्यार्थ्यांना प्रशन विचारले व त्याचे उत्तर देण्या-या विद्यार्थ्यांना रोख रक्कम म्हणुन बक्षिस दिले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन कडून युनानी प्रदर्शन व कोरोना गॅलरीचे प्रदर्शन चे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यार्थ्यानी युनानी पध्दतीने आजारांवर होणा-या औषोधउपचार माहिती दिली. जेवणा नंतर ,चेन्नई येथील मा.डॉ.उबेदउल्ला बेग प्रात्यक्षीक दाखुन सांगितले की युनानी औषधीने सुध्दा ताबडतोब आराम होऊ शकतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्वस यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी हॉस्पीटल सटॉफ, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsइकरा युनानी मेडीकल महाविद्यालयामध्ये युनानी दिवस साजरा
Previous Post

कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

स्टोअर रूम फोडून एलसीडीची चोरी करणारा दुसरा संशयित गजाआड

Next Post
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

स्टोअर रूम फोडून एलसीडीची चोरी करणारा दुसरा संशयित गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group