मुंबई, वृत्तसंस्था : जीओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच ऑफर खास आणत असते. खरंतर, कंपनीने असे अनेक प्लॅन्स आणि ऑफर दिल्या आहेत. ज्याबद्दल बहुतेक वापरकर्त्यांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा चार पॉप्युलर योजनांविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटासोबत मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.
या योजनांची सुरुवाती किंमत 129 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तर इतर चार योजनांमधली शेवटची योजना 555 रुपयांपर्यंत आहे. यामध्येही तुम्ही 84 दिवसांसाठी लाभ घेऊ शकता. जाणून घेऊयात अशा योजनेबद्दल
129 रुपयांची जिओची योजना
जिओने दिलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2 जीबी डेटा मिळणार. यामध्ये तुम्ही Jio ते Jio अनलिमिडेट कॉलिंग सुविधा, Jio ते नॉन Jio नेटवर्कसाठी 1000 मिनिटं अशी ऑफर देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर यामध्ये 300 एसएमएस आणि जिओ अॅप्सदेखील वापरता येणार आहेत.
जिओची 149 रुपयांची योजना
या खास योजनेमध्ये तुम्हाला रोज एक जीबी डेटा मिळेल. या योजनेची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.तर तुम्ही रोज 100 एसएमएससह अनेक अॅप्सही वापरू शकता.
199 मध्ये जिओचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसही करता येणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक अॅप्सही वापरता येतील.
Jio चा 555 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही 84 दिवसांत एकूण 126 जीबी डेटा वापरू शकता. रोजचा डेटा संपल्यानंतर तुम्हाला 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस करता येतील.


