Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेलच्या दरात रेकॉर्ड स्तरावर, पेट्रोलचे दर शंभरी पार

by Divya Jalgaon Team
February 16, 2021
in राष्ट्रीय
0
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol and Diesel Prices) सातत्याने वाढत आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर 29-38 पैशांनी वाढले आहेत. या वाढीनंतर आज देशातील अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोलचे भाव प्रति लीटल 100 रुपयांच्या पलीकडे आहेत. महाराष्ट्रातीलही अनेक शहरात पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ पोहोचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 95.75 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचे दर 86.72 रुपये प्रति लीटर आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसाठी इंधनाचे भाव आवाक्याबाहेरील आहेत. नागपूर, कोल्हापूर नाशिक, पुणे या महत्त्वाच्या शहरातही इंधनाचे भाव चढेच आहेत.

दिल्लीमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती अनुक्रमे 89.29 रुपये प्रति लीटर आणि 79.70 रुपये प्रति लीटर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते आहे. सोमवारी लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये सुरुवातीच्या सत्रात WTI क्रूडची किंमती 0.69 डॉलरने वाढून 60.16 डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर देखील 0.87 डॉलर प्रति बॅरलने वाढून 63.30 डॉलर झाल्या आहेत.

रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

Share post
Tags: New DelhiPetrol-diesel Rateपेट्रोल-डिझेलच्या दरात रेकॉर्ड स्तरावरपेट्रोलचे दर शंभरी पार
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १६ फेब्रुवारी

Next Post

जबरदस्त ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग

Next Post
जबरदस्त ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग

जबरदस्त ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group