अमळनेर – तालुक्यातील लोण पंचम येथील रविवार सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील लोण पंचम येथील रहिवाशी नारायण यशवंत पाटील (वय ५५) रविवारी सकाळी विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणायला गेले. बराच वेळ झाला तर ते परत आले नाही. योगीराज न्हावी यांनी त्यांच्या कुटुंबाला कळवले की, नारायण पाटील हे गावाबाहेरील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाय घसरून पडले.
गावातील अनिल पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीत उतरून नारायण पाटील यांचे मृतदेह बाहेर काढला. विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रोहिदास जाधव व सचिन निकम करीत आहेत.