Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपाला धक्का : 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

by Divya Jalgaon Team
February 14, 2021
in Uncategorized, जळगाव, राजकीय
0
भाजपाला धक्का : 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण, त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे.

भुसावळमधील खडसे समर्थक १८ विद्यमान नगरसेवक, १३ माजी नभाजपाला धक्का : 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेशगरसेवक आणि कुटुंबीयांनी जळगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे: एकनाथराव खडसे

दरम्यान, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर भडकले होते. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत. अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे. एक रुपया त्यांनी दिला नाही. मुक्ताईनगर अनेक सिंचनाचे प्रश्न तेव्हापासून रखडलेले आहेत. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जामनेरमध्ये सिंचनाची कामे झाली नाहीत, त्या ठिकाणी जी कामे झाली असतील ते एकनाथ खडसे यांच्यामुळे झाली आहेत, अशीही टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.

३१ नगरसेवक-पदाधिकारी राष्ट्रवादीत

भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगसेवक दत्तू सुरवाडे, हेमलता इंगळे, माजी नगरसेवक राहुल मकासरे, प्रशांत अहिरे, किशोर पाटील, वसंत पाटील, माजी भाजप अध्यक्षा पुरुषोत्तम महाजन, आशिक मुन्ना तेली, माजी नगरसेविका सोनल महाजन, पौर्णिमा नेमाडे, प्रिया चौधरी, शालिनी कोलते, प्रीती पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज, शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी पंचायत समिती सदस्या प्रभा सपकाळे, दर्शन चिंचोले, एजाज खान खलील खान, आरती नेमाडे, अनिकेत पाटील, आशिष महाजन, पृथ्वीराज पाटील, विनय बऱ्हाटे, सुमित बऱ्हाटे, यशांक पाटील, माजी नगरसेवक किरण महाजन, नीलेश वारके, चैताली इंगळे, प्रशांत नरवाडे, गणेश पाटील, संघदीप नरवाडे, माजी नगरसेवक शेख चिराग शेख गुलाब, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम शेख निमामुद्दीन, इस्माईल अकबर मेनन, अजीम खान खलील खान, आफताब खान, मो अमीन मो बिसार कुरेशी, शेख शब्बीर शेख इस्माईल, बिस्मीला तडवी, हसनूददीन पेंटर, रहेमूदीन, शेख रउप शे गणी, डॉ. नीलेश झोपे, अब्बास शाह, रहीम शाह, वासीम खान आजीम खान, झाकिर खाटीक, रेहान कुरेशी अशी प्रवेश केलेल्या खडसे समर्थ नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

Share post
Tags: भाजपाला धक्का : 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १४ फेब्रुवारी २०२१

Next Post

अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post
अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group