यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीकोणातुन जेष्ठ दिवगंत नेते जिवराम तुकाराम महाजन यांनी सुतगिरणीच्या रूपाने प्रकल्पची उभारणी केली होती त्याच प्रकल्पवर आज यावल नगर परिषदने मागील दहा वर्षापासुन कर न भरल्याने आज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे .
दरम्यान नगरपरिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्या आदेशाने आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नगर परिषदचे सहाय्यक कर निरिक्षक निकेतन प्रभाकर बयाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक राजेन्द्र चिंतामण गायकवाड , अनिल हरचंद चौधरी , रवीन्द्र रघुनाथ बारी , मधुकर राजाराम गजरे, संतोष किसन नन्नवरे , असदुउल्ला खान इबादुल्ला खान आणी रफीक अहमद सईद अहमद अरब यांच्या पथकाने ही जे .टी . महाजन सुतगिरणीची कडील मागील सन् २०१२पासुनचे गट क्रमांक२१३१ , २०३२ आणी २०३० या गटातील मालमत्तेचे कर१ कोटी८४ लाख१२ हजार९६४ रुपयांची करापोटीची थकबाकी रक्कम मागील १० वर्षापासुन न भरल्याने जे .टी . महाजन सुतगिरणी प्रकल्पच्या मालमत्ताची जप्ती करण्यात आली आहे .
दरम्यान यावल नगरपरिषद व्दारे यावल तालुक्यातील एकेकाळी वैभव समजल्या जाणाऱ्या शेतकरी हिताचा मधुकर सहकारी साखर कारखाना व आता ही सुतगिरणी या मोठया प्रकल्पावर मालमत्ता जप्तीची वेळ आल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्राची अद्योगतीकडे वाटचाल झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड असा नाराजीचा सुर निघत आहे . नगर परिषदच्या या धडक वसुली मोहीमेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे असा प्रकारे मोठया मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर परिषदच्या सुत्रांनी दिलेल्या माहीती व्दारे सांगीतले आहे .