मुंबई, वृत्तसंस्था : संपूर्ण क्रिकेट जगतात आयपीएल स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर आहे. आयपीएल खेळणं आता अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न बनलं आहे. आयपीएलचं इतकं देखणं रुप बघून अनेक देशांना आयपीएलची भुरळ पडलीय. अशातच आयपीएलच्या धर्तीवर इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आता आपली स्वत:ची टी-ट्वेन्टी सुरु करण्याची घोषणा केली आहे.
इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने संभावित टी-ट्वेन्टी लीग यूएईमध्ये होणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच या स्पर्धेत क्रिकेट जगतातले दिग्गज खेळाडू सहभागी होतील, अशी आशा इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलीय. जसं भारतातल्या क्रिकेट रसिकांवर आयपीएलचं गारुड आहे तसं यूएईमधल्या क्रीडा रसिकांनाही टी-ट्वेन्टी क्रिकेट खूप आवडतं. यूईएमधल्या ग्राऊंडवर एखादी टी-ट्वेन्टी मॅच असली की तिथले स्थानिक प्रेक्षक मॅचसाठी तुफान गर्दी करतात.
इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की टी -20 लीगचा पहिला हंगाम यावर्षी होणार आहे. लीगचे आयोजन डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत केले जाईल. या लीगला इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नहयान मुबारक अल नहयान यांचंही समर्थन आहे. यूएईने याअगोदरही स्थानिक पातळीवर टी-20 क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं आहे.
आयपीएलच्या धर्तीवर फ्रँचायजीकडूनच खेळाडूंची बोली लागेल. या स्पर्धेत क्रिकेट जगतातले अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत सहा टीम खेळतील. या सहा टीमच्या फ्रेंजायजीबद्दल तसंच या पुढची माहिती लवकरात लवकर जाहीर करु, असं इमिरेट्स क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.
भारतातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये आयपीएलच्या पहिला हंगामातले काही सामने यूएईमध्ये खेळले गेले होते. तसंच 2020 मध्ये देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएला पूर्ण हंगाम यूएईमध्ये खेळला गेला. अतकंच नाही तर पाकिस्तान सुपर लीगचे काही सामनेही दुबईमध्ये खेळले गेलेत.